जीवघेणी स्टंटबाजी

  • सय्यद झैन & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

विलेपार्ले - मुंबईतल्या लोकल ट्रेनमधला आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. जीवघेणी स्टंटबाजी करताना एक मुलगा तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता. विलेपार्ले स्टेशनवर रात्री बारा वाजता काही तरूण बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढतात. त्यांच्यापैकी एक तरूण धावत्या ट्रेनमध्ये स्टंटबाजी करू लागतो. त्यांच्यासोबत चढलेले मित्र त्याला टोकण्याएेवजी स्टंटबाजीचा व्हिडिओ बनवतात. पण अचानक तो मुलगा असं काही करतो की सर्वांची पायाखालची जमिनच सरकते. स्टंटबाजी करण्याच्या नादात हा मुलगा चक्क ट्रेनच्या खिडकीपर्यंत जातो आणि त्यानंतर असाच ट्रेनच्या बाहेर लटकत तो डब्याच्या दुसऱ्या दरवाज्यापर्यंत पोहोचतो. 17 सेकंद लागतात त्याला हा जिवघेणा स्टंट करण्यासाठी. आयुष्याचा एक-एक सेकंद किमती असतो. पण अशी स्टंटबाजी करत आपला जीव धोक्यात टाकणाऱ्यांना तुम्हा काय बोलाल? स्टंटबाजी करण्याच्या नादात कित्येकांनी आपले प्राण गमावलेत. रेल्वे प्रशासनाकडून स्टंटबाजी करणाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण पालथ्या घड्यावर पाणी.

अशा स्टंटबाजांना ‘मुंबई लाइव्ह’कडून विनंती आहे की त्यांनी अशी जीवघेणी स्टंटबाजी करू नये. हे लक्षात ठेवा तुमचे आई - वडिल, बायको, पोरं-बाळं तुमची घरी वाट पाहतायेत. जीव गेला तर तो पुन्हा मिळणार नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या