मंत्रालय कर्मचाऱ्याच्या घरी चोरी

कांदीवली - समतानगर येथील बिल्डिंग क्रमांक 11 मध्ये राहणाऱ्या मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याच्या घरात चोरी झाल्याची घटना होळीच्या दिवशी म्हणजेच 13 मार्चला घडली. मंत्रालयात काम करणाऱ्या जनार्दन मोरे यांच्या घरात झालेल्या चोरीत तब्बल 25 तोळा सोनं आणि 60 हजारांची रक्कम चोरानं लंपास केली. घरात कुणी नसल्याचे पाहून चोराने ही चोरी केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप यादव यांनी दिली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या