अल्पवयीन मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अल्पवयीन मुलांची परदेशात घरकामांसाठी विक्री करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघाजणांना अटक केली. शरीफा पठाण, मोहम्मद फझल पठाण आणि आफ्रिन खान अशी तिघांची नावे असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. यातील अल्पवयीन मुलींना वाढवून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले जात असे, तर मुलांना तेथील घरकामांना जुंपले जात असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

हेही वाचाः- राणी बागेत पाहायला मिळणार भारतातील पहिली ट्राम

वांद्रे येथील कुरेशीनगर झोपडपट्टीत स्त्री बालकाची विक्री करण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा९च्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुधीर जाधव आणि त्यांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचत तिघांना ताब्यात घेतले. शरीफा पठाण, मोहम्मद फझल पठाण आणि आफ्रिन खान अशी तिघांची नावे आहेत. पोलिसांच्या पथकाने तिघांची चौकशी केली असता बिहारमधील एका महिलेने मुलीची विक्री केल्याचे समोर आले. पंधरा ते वीस दिवसांचे बाळ घेऊन हे टोळके अन्य एका दलालाला विकण्यासाठी निघाले होते, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली.

हेही वाचाः- मुंबईतील किमान तापमानात दुसऱ्यांदा घट

विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांकडून ताब्यात घेतलेल्या मुलीला तिच्या जन्मदात्या आईनेच विकल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. तिघांना अटक केल्याचे समजताच तिची आई पसार झाली असून तिने १० हजारांत मुलीला विकले होते. पोलिस मुलीच्या आईचा शोध घेत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या