मुंबईत पुन्हा छम छम

मुंबई - मुंबईत पुन्हा एकदा डान्स बारची छम छम सुरू होणार आहे. मुंबई पोलिसांनी तीन डान्स बारना परवाना दिला आहे. ताडदेवचा इंडियन, अंधेरीचा एरो पंजाब आणि साई प्रसाद अशी या बारची नावे आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच हे परवाने देण्यात आले आहेत. परवानगी मिळाली असली तरी तूर्तास हे बार सुरू होणार नाहियेत. बार मालक आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सध्या सुप्रीम कोर्टात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे वेट अॅण्ड  वॉचचे धोरण या बारमालकांनी अवलंबल्याच समजतंय.

सुप्रीम कोर्टाने याआधीच डान्स बारवरील बंदी उठवली होती खरी. मात्र त्यानंतर महाराष्ट्र शासनाने नियम आणखीन कडक केले होते. त्याविरोधात डान्स बार मालकांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. राज्य सरकारने डान्स बारना 2016 च्या नियमाऐवजी 2014 च्या नियमावलीनुसार परवाने देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबर महिन्यात दिले होते. त्यानंतर या तिन्ही डान्स बारने परवानगीसाठी अर्ज केले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या