वाहन पेटवणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

धारावी - वाहन पेटवणाऱ्या दोघांविरोधात धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. या दोघांनी धारावीच्या आकाशगंगा इमारतीत उभी असलेली दोन दुचाकींसह एक कार सोमवारी पेटवून दिली. या घटनेत दोन अॅक्टिव्हा पूर्णपणे जळून खाक झाली. तर वॅगनआर कारचे किरकोळ नुकसान झालंय.

धारावीतल्या 90 फिट रस्त्यावरील आकाश गंगा इमारतीत राहणाऱ्या अमर धनेश्वर, शाम ताडमली आणि कारमालक सुदाम शिखरे यांनी आपली वाहनं सोमवारी नेहमीप्रमाणे इमारतीच्या आवारात पार्क केली होती. मात्र मध्यरात्री अचानक इमारतीच्या आवारात काहीतरी जळत असल्याचा वास दरवळू लागल्यानं इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी तात्काळ तळमजल्याकडे धाव घेतली आणि समोरील दृश्यं पाहून ते हबकले आणि त्यांनी तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनातील पेट्रोलमुळे आग आणखीनच भडकली. त्यानंतर रहिवाशांनी धारावी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी धारावी पोलिसांचा तपास सुरू झाला असून इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यानं पोलिसांची डोकेदुखी वाढणार असल्याचं दिसत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या