पार्किंगमधल्या दुचाकी जाळल्या

चेंबूर - पेस्तम सागर परिसरात गुरुवारी पहाटे अज्ञात इसमांनी सहा दुचाकी जाळल्याची घटना समोर आलीय. यात सहा दुचाकी जळून खाक झाल्यात. पेस्तम सागर परिसरात असलेल्या एसआरए इमारतीच्या बाजूला रहिवाशांनी त्यांच्या दुचाकी पार्क केल्या होत्या. मात्र अज्ञात इसमांनी आग लावून पळ काढला. रहिवाशांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकींना लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. टिळकनगर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या