अपघात टाळण्यासाठी झोपडीधारकांना मार्गदर्शन

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

वडाळा - रेझिंग डे च्या निमित्ताने वडाळा लोहमार्ग पोलिसांनी अपघात टाळण्यासाठी वडाळा ते जी. टी. बी. स्थानकालगतच्या झोपडीधारकांना मार्गदर्शन केले.

तसेच रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्याबाबत दक्षता घ्या, चालत्या लोकलवर दगड, फुगे अथवा तत्सम गोष्टी फेकून मारू नये. तसेच धावत्या लोकलमधून एखादा प्रवासी खाली पडल्यास त्याला तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी या दृष्टीने पुढाकार घेऊन प्रयत्न करा. त्याचप्रमाणे संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू आढळल्यास पोलिसांच्या 9833331111 या क्रमांकावर संपर्क साधावा. याबाबत पोलिसांनी झोपडी धारकांमध्ये जनजागृती करत ‘बी-सेफ’चा संदेश देणारी पत्रकं तिथल्या राहिवाशांना वाटण्यात आली. 4 जानेवारीला राबवलेल्या या जनजागृती मोहीमेत वडाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे, पोलीस उप-निरीक्षक डी. जी. गीते, मंगेश साळवी, संतोष गव्हाणे, प्रवीण साळसकर, मुकुंद कोकणे, सारिका भोसले, मंजुळा सोळंकी, सारिका चांदिवडे आदी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या