चर्चगेट ट्रेन पकडली आणि धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग

पश्चिम रेल्वेवरील ग्रॅण्ट रोड स्थानकात धावत्या लोकलमध्ये एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत तरुणीने मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून रेल्वे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

मालाड येथे राहणाऱ्या तरुणीने चर्नी रोडहून चर्चगेट दिशेकडील लोकल पकडली. लोकल ग्रॅण्ट रोड स्थानकात पोहोचताच तरुणाने तिच्याशी अश्लील भाषेत बोलणे सुरू करत शिवीगाळ केली. तरुणीने आरडाओरडा केला असता, त्याने धावत्या लोकलमधून पळ काढला. ही घटना २४ जून रोजी घडली.

रुणी खासगी कंपनीमध्ये नोकरी करते. तिने २८ जून रोजी तक्रार केल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे, असे मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हार्बर मार्गावरील प्रवासात तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला होता. नेरुळ येथून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पनवेलला निघालेल्या लोकलमध्ये विनयभंग झाल्याची तक्रार या महिलेने नोंदवली होती. 


पुढील बातमी
इतर बातम्या