चेंबुर रेल्वे स्टेशनवर चाकूच्या धाकात मुलाला लुटले

तिकीट काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या 13 वर्षांच्या मुलाला चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना शनिवारी रात्री चेंबूर रेल्वे स्थानकात घडली. चेंबूरच्या लोखंडे मार्ग परिसरात राहणारे अनिल जैन यांचा मुलगा दिनेश हा शनिवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास घाटकोपरला जाण्यासाठी चेंबूर रेल्वे स्थानकात आला होता. चेंबूर पूर्वेला असलेल्या तिकीट घराजवळ तो तिकीट काढण्यासाठी उभा असताना एका अज्ञात व्यक्तीने या मुलाला बाजूला घेत त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाइल फोन आणि काही रोख रक्कम असा एकूण 5 हजारांचा ऐवज हिसकावून घेत पळ काढला. मुलाने तात्काळ ही बाब वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी रात्रीच चेंबूर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या