किल्ला बनवा उपक्रम

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • संस्कृती

सायन - दिवाळी सणानिमित्त सायन येथील डी. एस. विद्यालयात बुधवारपासून किल्ला बनवा हा उपक्रम सुरू झाला आहे. शिक्षणसंस्था आणि चित्रपतंग समूहाने हा उपक्रम आयोजित केला आहे. यंदा या शाळेतील विद्यार्थी जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी भिंत असणारा राजस्थानच्या कुंभालगड किल्ल्याची प्रतिकृती साकारणार आहेत. या शाळेतील इयत्ता आठवी, नववी आणि दहावीचे विद्यार्थी मिळून हा किल्ला बनवणार आहेत. संपूर्ण किल्ला हा शनिवारी संंध्याकाळपर्यंत तयार होईल असं चित्रपतंग समूहाचे प्रमुख श्रीनिवास आगवणे यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या