अकरावीची प्रवेश पुस्तिका 29 मे पासून

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीची प्रवेश पुस्तिका 29 मे पासून महाविद्यालयात देण्यात येणार असल्याची माहिती उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली.

ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना दोन अर्ज भरावे लागणार आहेत. त्यातच निकालाआधी प्राथमिक माहिती भरावी लागेल आणि निकालानंतर गुण आणि महाविद्यालयाविषयीची माहिती विद्यार्थ्यांना अर्जात भरावी लागेल. त्यामुळे निकालाआधी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

गेल्या आठवड्यापर्यंत पुस्तिका छापून न झाल्यामुळे ही प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. मात्र आता पुस्तिका छापून झाल्याने सोमवारनंतर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. गेल्यावर्षी 2 मे रोजी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र या वर्षी मे अखेर आला, तरी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे काही काळ पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या