सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर

File Image
File Image

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा (सीबीएसई) दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. सीबीएसईचे १० वीचे ९९.४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसईने दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल अधिकृत वेबसाईट  cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in जाहीर केले आहेत. 

दहावीच्या २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं त्यांच्या वर्षभराच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन केलं आहे. यामध्ये प्रॅक्टिकल, युनिट टेस्ट, प्री-बोर्ड, मिड टर्म यांचा समावेश आहे. पहिल्यांदाच सीबीएसईने परीक्षेशिवाय दहावीचे निकाल जाहीर केले आहेत. यामुळे निकालाची टक्केवारी वाढली आहे.

गेल्या वर्षी १८,८५,८८५ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १७,१३,१२१ विद्यार्थ्यांनी १० वीची परीक्षा ९१.४६ टक्क्यांसह उत्तीर्ण केली. सीबीएसईने नापास शब्दाऐवजी Essential Repeat चा वापर विद्यार्थ्यांच्या निकालावर केला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालांवर नापास शब्दाचा उल्लेख केला जाणार नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या