एकही शाळा बंद करु देणार नाही, छात्र भारतीचा इशारा

शाळा बंदच्या सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी छात्र भारती आणि शिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष आणि मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतलं.

'नंदकुमार यांना हटवा'

राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याची भाषा करणाऱ्या राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांना तात्काळ हटवण्याची मागणी शिक्षक भारतीने मुख्यमंत्री यांच्याकडे केली. शिक्षण सचिवांनी टप्प्या टप्प्याने ८० हजार शाळा बंद करुन केवळ ३० हजार शाळा सुरु ठेवण्याचा मास्टर प्लान जाहीर केला आहे. २०, ३० आणि ५० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा पहिल्या टप्प्यात बंद होणार. त्यानंतर १५० पेक्षा कमी पटसंख्या कमी असणाऱ्या शाळा बंद केल्या जातील. गरीबांचं, आदिवासी मुलांचं शिक्षण उद्ध्वस्त करण्याचा सरकारचा डाव आम्ही उधळून लावू. एकही शाळा बंद करु देणार नाही, असा इशारा छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी दिला आहे. याचा निषेध म्हणून उद्या राज्यातील सर्व शिक्षक सकाळी ११ वाजता घंटानाद करत काळ्या फिती लावून काम करणार आहेत.

शिक्षण मंत्र्यांची सारवासारव

८० हजार शाळा बंद करण्याची कोणतीही योजना नाही ही अफवा आहे असा बचाव राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे करत आहेत. राज्याच्या शिक्षण सचिवांनी केलेली घोषणा ही अफवा कशी असू शकते. सरकारी व अनुदानित शिक्षण उद्ध्वस्त करण्याचा प्लान शासनाने जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील शाळा बंद करण्याचा निश्चय व्यक्त करणाऱ्या शिक्षण सचिव नंदकुमार यांना त्वरीत हटवावे, अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे.

आधी शासनाने गुणवत्तेचे कारण देत १० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला शिक्षक भारतीने तीव्र विरोध केला होता. आता हजार पटसंख्या असणाऱ्या शाळा यापुढे सुरु ठेवता येतील, अशी घोषणा शिक्षण सचिवांनी केली आहे. यामुळे शासनाचा खरा चेहरा समोर आला आहे.

- जालिंदर सरोदे, प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती


हेही वाचा-

राज्यात ८० हजार शाळा बंद करण्याचा कुठलाही विचार नाही- तावडे


पुढील बातमी
इतर बातम्या