मनपाच्या 480 शाळांमध्ये आधुनिक पद्धतीने म्हणजेच (व्हर्च्यूअल क्लास रुम) पद्धतीने शिक्षण दिले जाते. इंटरनेटच्या वाढलेल्या वेगामुळे आता इंटरनेटचा वापर कलासरूममध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मनपा शाळेतील शिक्षण वेगवान होईल. याचा फायदा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थी घर बसल्या लेक्चर अटेंड करू शकतील. येत्या शैक्षणिक वर्षापासून अशा 202 शाळा नव्याने सुरू करण्यात येतील. यासाठी अंदाजे 21 कोटी 84 लाखांची तरतुदी करण्यात आली आहे.