पेपर तपासणीसाठी चार दिवस कॉलेज बंद

परीक्षांचे रखडलेले निकाल मार्गी लावण्यासाठी परीक्षा विभागाने चक्क 4 दिवस कॉलेजेसच बंद ठेवली आहेत. कॉलेजेस बंद ठेऊन शिक्षकांना पेपर तपासणीसाठी जुंपले जाणार आहे. त्यामुळे 24 ते 27 जुलैदरम्यान कॉलेजमध्ये कोणतेही तास होणार नसल्याचे मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहे.

विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी 31 जुलैपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल लागावे, अशी कुलगुरूंना तंबी दिली होती. त्यांनतर 31 जुलै पर्यंत निकाल लागतील, अशी शक्यता होती. त्यामुळे कुलगुरूंनी नागपूर विद्यापीठाची मदत घेण्याचे ठरवले. तरीही 6 लाख उत्तरपत्रिका एवढे मोठे आव्हान विद्यापीठासमोर आहे. त्यामुळे आता 4 दिवस कॉलेजेस बंद ठेऊन, शिक्षकांना पेपर तपासणीला जुंपण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. या काळात प्राध्यापकांनी कोणतेही तास न घेता, पेपर तपासणी करावी. असा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. मात्र तरीही पूर्ण पेपर तपासणी न झाल्यास, कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी गोंधळात

हा निर्णय शनिवारी रात्री उशिरा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना या सुट्टीबद्दल माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी सोमवारी कॉलेजला हजेरी लावली. पण लेक्चरच होणार नाही म्हटल्यावर अनेक विद्यार्थी बुचकळ्यात पडले. या सुट्ट्यांचे नेमके कारणच माहीत नसल्यामुळे कॉलेजेसमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

'त्या' प्राध्यापकांवर कारवाई होईल

24 ते 27 जुलै या काळात प्राध्यापकांनी एकही तास न घेता. सहा तास पेपर तपसणी आणि मॉडरेशन करायचे आहे. जे प्राध्यापक हे काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बोर्डाने दिली आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या