पालिका शाळांमध्ये समुपदेशक नेमा; साईनाथ दुर्गे यांची मागणी

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्या सोडवण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्याची मागणी शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी केली आहे. समुपदेशक नेमल्यास विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेऊन मार्गदर्शन करणे सोपे जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अात्महत्या अाणि मानसिक खच्चीकरण टाळता येईल, असं दुर्गे यांनी म्हटलं अाहे. 

शिक्षणावर गंभीर परिणाम

 पालिका शाळांमध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे आर्थिक दुर्बल घटकातील अाहेत. कुटुंबाची आर्थिक स्थिती अाणि समाजातील वाईट गोष्टींचा प्रभाव त्यांच्या मानसिकतेवर होऊन त्याचा शिक्षणावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या मानसिक अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी समुपदेशक नेमले जावेत, असं निवेदन त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलं अाहे. 

आर्थिक अडचण नाही

पालिकेच्या ११८७ शाळांमध्ये २ लाख ९६ हजार विद्यार्थी शिकत अाहेत. तर शिक्षकांची संख्या १२ हजार अाहे. पालिका शाळांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी असताना त्यांच्यासाठी समुपदेशक का नाही असा सवाल दुर्गे यांनी केला अाहे. पालिका शाळांमध्ये चांगलं शिक्षण दिलं जात अाहे. मात्र,  विद्यार्थी बाहेरील आकर्षणाला बळी पडत अाहेत. शालेय विभागासाठी अर्थसंकल्पात २५७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे समुपदेशक नेमण्यात आर्थिक अडचण येणार नाही, असं दुर्गे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा - 

शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात

अतिरिक्त गुणांपासून हजारो विद्यार्थी वंचित; उच्च शिक्षण, नोकरीची संधी हुकली


पुढील बातमी
इतर बातम्या