शिक्षक पात्रता परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२१ साठी ऑनलाईन अर्ज भरण्यास ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी अद्याप अर्ज करून न शकलेल्या उमेदवारांना आता अर्ज करता येणार आहे.

टीईटी परीक्षा १० ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित किंवा विनाअनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. 

या परीक्षेसाठी ३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र ज्या उमेदवारांचे अर्ज प्रलंबित आहेत किंवा ज्यांनी अर्ज केला नाही अशा उमेदवारांना अर्ज करण्यासाठी परीक्षा परिषदेकडून ५ सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे, असे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. 

परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या