आयआयटी मुंबईच्या वसतिगृह शुल्कात 300 टक्के वाढ, विद्यार्थी नाराज

देशातील नामांकीत शैक्षणिक संस्था अशी ओळख असलेल्या 'आयआयटी मुंबई'च्या वसतिगृह शुल्कात तब्बल 300 टक्के वाढ करण्यात आली आहे. या शुल्कवाढीमुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कमालिची नाराजी पसरली आहे. या शुल्कवाढीचा फटका गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता असल्याने ही शुल्कवाढ मागे घेण्याची विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे.

पवईतील आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा देण्यात आली आहे. येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून यापूर्वी 500 रुपये भाडे घेण्यात येत होते. आता हेच भाडे 2000 रुपये करण्यात आले आहे.

एवढेच नव्हे, तर खानावळीच्या शुल्कातही 33 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वैद्यकीय, नोंदणी, परीक्षा शुल्कातही 100 टक्क्यांहून अधिक वाढ केल्याने पोटाला चिमटा घेऊन येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे.

20 वर्षांनंतर आयआयटी मुंबईने वसतिगृह शुल्कात वाढ केली आहे. मात्र या शुल्कवाढीमुळे विद्यार्थी नाराज झाले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या