मुंबई विद्यापिठात विद्यार्थिनी असुरक्षित?

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

कलिना - मुंबई विद्यापीठ. राज्यभरातून अनेक विद्यार्थी या विद्यापिठात शिक्षण घेण्यासाठी येतात. आता विद्यापिठाचं वाचनालय 24 तास सुरू असणार आहे. हे वाचनालय 24 तास सुरू झालं तरी विद्यार्थिनींना रात्री आठ नंतर थांबणं अशक्य झालं आहे.

राज्यातीलच नव्हे तर देशातील महत्त्वाचं असं समजल्या जाणाऱ्या विद्यापिठाची ही अवस्था आहे. जर मुंबई विद्यापीठच मुलींसाठी सुरक्षित नसेल तर राज्यातील खेड्यापाड्यातील शाळांचा विचार न केलेलाच बरा. परीक्षाभवन सोडलं तर विद्यापीठ कॅम्पसमध्ये सीसीटीव्हीचा पत्ता नाही. चारही बाजूने संरक्षण भिंती बांधलेल्या नाहीत. त्यामुळे आता शक्य तितक्या लवकर सुरक्षेच्या सुविधा उपलब्ध करुन द्या अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या