हे बहुविद्याशाखीय अर्थशास्त्र, व्यवस्थापन, ऑपरेशन्स रिसर्च, कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि गणित यासारख्या क्षेत्रांतून कौशल्य प्राप्त करेल. एमओसीएमची योजना अंडरग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्तरांवर अनेक शैक्षणिक कार्यक्रमाची आहे. केंद्राने ऑनलाइन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाची कल्पना देखील केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तविक-जगातील डेटासह व्यावहारिक प्रशिक्षण आणि आर्थिक क्षेत्राचे भविष्य घडविण्याची संधी प्रदान करणार आहे.
दरम्यान, आयआयटी मुंबईचे संचालक प्राध्यापक शिरीष केदारे यांनी या महत्त्वाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, “ही देणगी आम्हाला आमच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि प्रगती करण्यास मदत करेल. तसेच जी ग्राउंडब्रेकिंग संशोधनाला चालना देण्यासाठी आवश्यक आहे. भांडवली बाजारासाठी मोतीलाल ओस्वाल केंद्राची स्थापना हा आयआयटी बॉम्बेसाठी महत्त्वाचा क्षण आहे. जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वात योगदान देण्याच्या आणि जागतिक उत्कृष्टतेची नवीन उंची गाठण्याच्या आमच्या व्यापक दृष्टीकोनाशी हे महत्वाचं पाऊल ठरेल. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनच्या दूरदर्शी योगदानाबद्दल आम्ही आभारी आहोत.”
हेही वाचा