आयआयटी मुंबईची जागतिक भरारी!

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

उच्च शिक्षण देणाऱ्या आशिया खंडातील संस्था (टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग) ची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, तंत्रशिक्षण देणाऱ्या आयआयटी मुंबई या संस्थेने जागतिक स्तरावर टॉप ३०मध्ये स्थान पटकावलं आहे. आयआयटी मुंबई या संस्थेने जागतिक स्तरावर २६ वा क्रमांक पटकावला असून ती भारतात दुसऱ्या स्थानावर आहे.

मुंबई विद्यापीठाला स्थान नाही

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) बेंगळुरूने देशात पहिल्या स्थानावर येण्याचा मान पटकावला असून ते या क्रमवारीत १३ व्या स्थानावर आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या यादीत १८० व्या स्थानावर आहे. दरम्यान, या जागतिक क्रमवारीत मुंबई विद्यापीठाला स्थान न मिळाल्याने विद्यापीठाने पुन्हा एकदा घोर निराशा केली आहे. आयआयटी मुंबई आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थांच्या क्रमवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुधारणा झाली असून, संशोधनाच्या बळावर दोन्ही संस्थांनी हे स्थान पटकावले आहे.

वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकतर्फे जाहीर झाली क्रमवारी

वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँक या संस्थेतर्फे ही क्रमवारी जाहीर करण्यात येते. या यादीत समावेश होण्यासाठी संस्थांना शैक्षणिक प्रतिष्ठा, कर्मचारी कौशल्य, विद्यार्थी संख्या, पीएचडी विभागातील शिक्षक, विभागानुसार संशोधन प्रबंध, आंतरराष्ट्रीय शिक्षक, विद्यार्थी यांसारख्या विविध गोष्टी लक्षात घेतल्या जातात.


हेही वाचा

आयआयटी मुंबईची सौरचूल देशात नंबर 1

पुढील बातमी
इतर बातम्या