इस्माईल युसुफ महाविद्यालयाचे प्रश्न सुटणार

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

जोगेश्वरी - इस्माईल युसुफ महाविद्यालयात उभारण्यात येणारं मुलींचं वसतीगृह तसंच कर्मचार्‍यांच्या निवासस्थानासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय. तसंच लवकर या महाविद्यालयात ऑलिंम्पिक दर्जाचा स्विमिंगपुल उभारण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण तसंच गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिली. इस्माईल युसुफ महाविद्यालयातील स्थानिक सल्लागार समितीची बैठक राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आले.

स्विमिंगपुलसाठी जिमखाना बिल्डींगजवळच्या जागेची पाहणी करण्यात आली. 35 फुट बाय 50 फुट या ऑलिंम्पिक साईजचा स्विमिंगपुल बांधण्याचा आराखडा तयार करण्याच्या सुचना वायकर यांनी अधिकार्‍यांना दिल्या. महाविद्यालयातील सोलार सिस्टम पूर्ववत करण्यासाठी ४ वर्षांपूर्वी बसवण्यात आलेले सोलार पॅनल बदलून नवीन सोलार पॅनल बसवण्याचा, महाविद्यालयाच्या गेटच्या दोन्ही बाजूला आरसीसीमध्ये चांगली पार्किंगची व्यवस्था, महाविद्यालयाच्या आवारात ७ ते ८ मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही, त्याचबरोबर मेसचा पुनर्विकास करताना येथील हेरिटेज इमारतींच्या सौदर्याला शोभेल अशी डिझाईन तयार करण्यात यावी, अशा अनेक सूचना वायकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना या वेळी दिल्या.

पुढील बातमी
इतर बातम्या