कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचं धरणं आंदोलन

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

आझाद मैदान - शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या सभासदांनी मंगळवारी आझाद मैदानात धरणं आंदोलन केलं. गेल्या वर्षी संघटनेनं पेपर तपासणीस असहकार आंदोलन केलं होतं. पण त्यानंतर सरकारतर्फे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. चार वर्षांपासून शिक्षकांना नियुक्ती मान्यता दिली नसल्यानं त्यांना वेतन मिळत नाहीये.  त्यामुळे शिक्षकांना तातडीनं नियुक्ती मान्यता आणि वेतन द्यावं, अशी मागणी या शिक्षकांनी केली.

शिक्षणमंत्री आश्वासन आणि घोषणा करतात. मात्र अधिकारी त्याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप शिक्षक संघटनेनं केलाय. "दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी," अशी मागणी संघटनेच्या वतीनं सहसचिव अनिल देशमुख यांनी केलीय. शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशाराही संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या