मुंबई विद्यापीठात लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानाचं आयोजन

सहकार क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून गणल्या जाणाऱ्या लक्ष्मणराव इनामदार यांच्या आदर्शांना आणि स्मृतींना उजाळा देण्यासाठी मुंबई विद्यापीठात 'लक्ष्मणराव इनामदार' या स्मृती व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. सहकार भारती आणि मुंबई विद्यापीठ यांच्यावतीने १५ नोव्हेंबर २०१८ रोजी या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे.

कार्यक्रमाची वेळ?

भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे लक्ष्मणराव इनामदार यांच्या सहकार क्षेत्रातील अमुल्य योगदानावर प्रकाश टाकणार असून मुंबई विद्यापीठाच्या ऐतिहासिक दीक्षान्त सभागृहात १५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

'या' मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. उदय जोशी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या