बोरिवलीत महाराष्ट्रधर्म व्याख्यानमाला

  • अमोल करडे & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

बोरिवली - बोरिवलीत महाराष्ट्र धर्म या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळातर्फे या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय. या महाराष्ट्रधर्म व्याख्यानमालेत 'शहाजीराजांची चातुर्यनीती', 'शिवरायांची युद्धनीती' आणि शंभूराजांची राजनीती' अशी तीन व्याख्यानं सादर करण्यात येतील. व्याख्यानमालेचं आयोजन चोगले हायस्कूल पटांगण, श्रीकृष्णनगर, बोरिवली पूर्व या ठिकाणी करण्यात आलंय. शुक्रवारपासून ही व्याख्यानमाला सुरू होणार असून १३ तारखेपर्यंत ती चालणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या