महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले आहेत. तर यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
८ जून म्हणजेच बुधवारी (उद्या) बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून थोड्याच वेळात अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. राजस्थान, उत्तराखंड, गुजरात, पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये 12वीचा निकाल लागला आहे, आता महाराष्ट्राच्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना आहे.
या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील.
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थीनी परीक्षा दिली होती. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
हेही वाचा