दहावी-बारावीच्या निकलाची तारीख जाहीर, 'या' दिवशी लागेल निकाल

दहावी-बारावी (SSC and HSC) निकाल (Exam Result) १० जूनपूर्वी जाहीर केले जातील, असं पुणे राज्य शिक्षण मंडळा तर्फे जाहीर करण्यात आलं आहे.  

दहावी-बारावीचे पेपर तपासण्यास शिक्षकांनी नकार दिला आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या निकालाला विलंब होण्याची शक्यता होती, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, मंडळानं अशा बातम्या निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका शिक्षकावर २५० पेपर तपासण्याची जबाबदारी असेल. प्रलंबित मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. मात्र, मंडळ आता १२ हजार आरक्षित शिक्षकांची मदत घेणार आहे. एका शिक्षकाला परीक्षेसाठी २०० ते २५० पेपर दिले जात आहेत.

पुणे राज्य शिक्षण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा (HSC) निकाल १० जूनला आणि त्यानंतर दहावीचा (SSC) निकाल जाहीर होणार आहे.

मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत पेपरची तपासणी करणार नाहीत. परंतु मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे छाननी आणि निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेत फारसा फरक पडणार नाही.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता १२वीच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरू झाल्या आणि त्या ७ एप्रिल रोजी संपतील. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) इयत्ता १०वीची परीक्षा १५ मार्चपासून सुरू झाली आणि शेवटचा पेपर ४ एप्रिलला झाला. महामारीनंतर पहिल्यांदाच बोर्डाची परीक्षा ऑफलाइन घेण्यात आली.

गतवर्षी परीक्षा ऑनलाइन झाल्यामुळे दहावी आणि बारावी दोन्हीचा निकाल ९९ टक्क्यांहून अधिक लागला होता. आता १२वीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होणार आहे. त्यामुळे अंतिम पेपरची प्रमाणित प्रक्रिया झाल्यानंतर ६० दिवसांनी निकाल जाहीर केला जातो.

यावेळी १२वीचा पेपर १५ दिवस उशिरा सुरू झाला. त्यामुळे १० जूनपर्यंत निकाल जाहीर करू आणि त्यानंतर पुढच्या ८ दिवसांनी दहावीचा निकाल लागेल, अशी माहिती मंडळानं दिली आहे.


हेही वाचा

मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कॉलेजेसमध्ये मराठीमध्ये नाम फलक बंधनकारक

अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या शाळाच एप्रिलमध्ये सुरू राहणार

पुढील बातमी
इतर बातम्या