आता मुलांना जास्त वेळ शाळेत बसावं लागणार...

प्रत्येक आठवड्याला मुलांनी शाळेत घालवायच्या एकूण तासांमध्ये तीन तासांची वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (एससीईआरटी) घेतला आहे. हा निर्णय दिवाळीनंतर लगेचच अंमलात आणायचा आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच आठवड्याला एकूण 45 तासांऐवजी 48 तास विद्यार्थ्यांना शाळेत घालवावे लागणार आहेत.

क्रिडा आणि कला या विषयांसाठी प्रत्येकी एक तास आणि इतर विषयासाठी एक असे तीन तास वाढवण्यात आले आहेत. विद्या प्राधिकरणाने(एससीईआरटी) नुकतंच एका परिपत्रकाद्वारे ही घोषणा केली आहे.

दर आठवड्याला तासांची संख्या कमी केल्यावरुन मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आता हे तास पुन्हा वाढवण्याचा निर्णय एससीईआरटीने घेतला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या