MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखा आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.   

एमपीएससीने परिक्षांचं सुधारीत वेळापत्रक जाहीर केलं आहे. यानुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. तर २७ मार्चला अभियांत्रिकी पूर्व परीक्षा, ११ एप्रिलला दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षांच्या तारखांची अद्यापही घोषणा करण्यात आली नाही. मात्र ऑगस्ट महिन्यात मुख्य परीक्षा घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्द सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं एमपीएसी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते की परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला अपात्र ठरविण्यात येणार नाही. आता पूर्व परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्य परीक्षेची तारीख कधी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.


हेही वाचा -

विद्यार्थ्यांसाठी महापालिका करणार २० कोटींच्या मास्कची खरेदी

विनातिकीट प्रवास करणाऱ्या 'इतक्या' प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई


पुढील बातमी
इतर बातम्या