MPSCच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लोकल प्रवासाची परवानगी

एमपीएससीची (MPSC) संयुक्त पूर्वपरीक्षा ४ सप्टेंबरला होणार आहे. मुंबईत येणाऱ्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली जात होती. केवळ परीक्षेपूर्तीच ही रवानगी देण्यातआली आहे.

याबाबत भाजप आमदार आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. शेलार यांच्या यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं आहे. ४ सप्टेंबर, शनिवारी होणाऱ्या MPSC परिक्षेसाठी उपनगरातील विद्यार्थ्यांना रेल्वे लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

यावर आशिष शेलार म्हणाले की, काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे केली. त्यानुसार तातडीनं मा. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे दूरध्वनीवरुन ही मागणी केली. हॉल तिकीट पाहून रेल्वे तिकीट देता येईल, अशी सकारात्मक भूमिका रेल्वे राज्यमंत्र्यांनी घेतली. मात्र राज्य शासनाचा तसा प्रस्ताव आवश्यक आहे, असंही सांगितलं. म्हणून तातडीनं राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनीही तत्काळ सकारात्मक्ता दाखवली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दुय्यम सेवा 'अराजपत्रित गट ब' संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी होणार होती. त्यानंतर राज्य शासनाने परीक्षा ९ एप्रिल रोजी पुढे ढकलली होती .आता ही परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे, असं परिपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढलं आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागानं परवानगी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे


हेही वाचा

MPSC ची परीक्षा ४ सप्टेंबरला

MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं, अजित पवारांची स्पष्टच कबुली

पुढील बातमी
इतर बातम्या