मुंबईतील शाळांना मराठी भाषेतून नावाची सक्ती

(Representational Image)
(Representational Image)

मुंबईतील प्रत्येक शाळाच्या पुढे मराठी (Marathi language) नावाची पाटी दिसणार आहे. याबाबत मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून (Mumbai Municipal Corporation) परिपत्रकाद्वारे आदेश जारी करण्यात आले आहेत.

नव्या आदेशानुसार इथूनपुढे शाळा कोणत्याही माध्यमाची असली तरी देखील शाळेसमोर मराठी भाषेतून बोर्ड लावणं बंधनकारक करण्यात आले आहेत. प्रत्येक शाळेपुढे आठ बाय तीन फूटाच्या बोर्डावर संबंधित शाळेचे नाव हे मराठी देवनागरी लिपीतून असावं असं म्हटलं आहे.

महापालिकेच्या या निर्णयामुळे मराठी भाषेला चालना मिळणार आहे. अनेक शाळांसमोर मराठी नावाची पाटी दिसत नाही, मात्र या निर्णयामुळे आता प्रत्येक शाळेसमोर मराठी नावाची पाटी दिसणार आहे.

मुंबईतील प्रत्येक शाळेचे नाव हे मराठीतून असावे यासाठी आता मुंबई महापालिकेच्या वतीने एक परित्रक देखील काढण्यात आले आहे. यात म्हटलं आहे की, प्रत्येक शाळेनं आपल्या शाळेसमोर आठ बाय तीन फूटाचा बोर्ड लावावा. या बोर्डवर संबंधित शाळेचे मराठीतून नाव टाकण्यात यावे.

नुकतंच मुंबई विद्यापिठानं देखील त्याच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजबाहेर नावाचे बोर्ड मराठीत लावण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी युवा सेनेने पुढाकार घेतला होता.


हेही वाचा

पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणार डिझाईनर गणवेश

दहावी-बारावीच्या निकलाची तारीख जाहीर, 'या' दिवशी लागेल निकाल

पुढील बातमी
इतर बातम्या