अकरावी प्रवेशाची तिसरी यादी ३१ जुलैला

कधी पाऊस, तर कधी सर्व्हर डाऊन यांसारख्या विविध कारणानं ब्रेक लागलेल्या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेची तिसरी यादी येत्या ३१ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.

यादी का पुढे ढकलली?

मुंबईतील अल्पसंख्याक ज्युनिअर कॉलेज, उच्च माध्यमिक विद्यालयांना अल्पसंख्याक, इनहाऊस, व्यवस्थापन कोट्यातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट केलेल्या सर्व जागा परत करण्याचे आदेश गेल्या आठवड्यात नागपूर खंडपीठानं दिले होते. त्यामुळे गुरूवारी २६ जुलैलाजाहीर होणारी यादी शिक्षण विभागानं पुढे ढकलली होती.

न्यायालयाची परवानगी

याच याचिकेवर बुधवारी झालेल्या सुनावणीत ३ कोट्यांपैकी केवळ इनहाऊस कोट्यातील जागा पुन्हा ११ वी प्रवेशाच्या यादीत समाविष्ट करण्याची परवानगी न्यायालयानं दिली. त्यानुसार येत्या ३१ जुलैला सकाळी ११ वाजता प्रवेशाची तिसरी यादी जाहीर होणार आहे.

'असं' असेल प्रवेशाचं नव वेळापत्रक :

तारीखवेळविषय
२६ जुलैसकाळी १०.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतअल्पसंख्याक महाविद्यालयांनी इनहाऊस जागा जाहीर करणं
२७ जुलैसकाळी ११ वाजतातिसऱ्या यादीसाठी सुधारित जागांची माहिती जाहीर करणं
२७ व २८ जुलैसकाळी ११ ते संध्याकाळी ६ पर्यंतविद्यार्थ्यांनी तिसऱ्या यादीसाठी अर्जाचा भाग १ व भाग २ भरणं
३१ जुलैसकाळी ११ वाजतातिसरी गुणवत्ता यादी वेबसाईटवर जाहीर होणार
३१ जुलै ते २ ऑगस्टसकाळी ११ ते संध्याकाळी ६विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेणं
३ ऑगस्टसकाळी ११ वाजतामहाविद्यालयांनी रिक्त जागा व तिसऱ्या गुणवत्ता यादीचा तपशील शिक्षण विभागाकडं जमा करणं
३ व ४ ऑगस्टसकाळी ११ ते संध्याकाळी ६ पर्यंतविद्यार्थ्यांनी चौथ्या यादीकरीता अर्जाचा भाग १ व भाग २ भरणं
७ ऑगस्टसकाळी ११ वाजताअकरावीची चौथी गुणवत्ता यादी जाहीर
७ ते ९ ऑगस्टसकाळी ११ ते संध्याकाळी ६विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेणं

एक्स्ट्रा लेक्चर घ्या...

त्याशिवाय ज्या महाविद्यालयातील प्रवेश ७० टक्के पूर्ण झाले आहेत त्यांना महाविद्यालय सुरू करण्यास शिक्षण संचालकांनी काहीच हरकत नसल्याचं सांगितल आहे. परंतु त्यानंतर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नंतर एक्स्ट्रा तास घेऊन त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा, अशी सूचना संचालकांनी परिपत्रकात केली आहे.


हेही वाचा-

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत पुन्हा गोंधळ, तिसरी यादी पुढे ढकलली

दुसऱ्या गुणवत्ता यादीत ७० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश


पुढील बातमी
इतर बातम्या