मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा भवनाच्या सावळ्या गोंधळाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मंगळवारी एक दिवसीय उपोषण केले. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये विद्यार्थी संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थी उपोषणाला बसले होते. आमदार किरण पावसकर आणि आमदार विद्या चव्हाण यांच्या मार्गदर्शनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. विद्यापीठाच्या निकाल दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचा त्रास संपत नाही. जर हा त्रास लवकर संपला नाही, तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल, असे मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अमोल मातेले यांनी सांगितले.
काय आहेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मागण्या?
- निकाल जाहीर झाल्यावर दुसऱ्या दिवशीच मार्कशीट द्या
- हेल्पडेस्कच्या नावाखाली विद्यार्थांना तासनतास वाट पाहावी लागते
- हेल्पडेस्कसाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अनुभवी व्यक्ती नेमा
- QP code & Bar code या तांत्रिक बाबीमध्ये विद्यार्थांना अडकवून विद्यार्थांची पिळवणूक केली जाते ती तात्काळ थांबवा
- ऑनलाईन पेपर तपासणीसाठी “Meritrack” कंपनीवर कारवाई करा,
- अनुभवी कंपनीला कंत्राट द्या
- पुनर्मूल्यांकन आणि फोटो कॉपीसाठी वाढणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता ही सुविधा विद्यार्थांसाठी “मोफत करा”
- पाच दिवसांत पुनर्मूल्यांकन आणि दोन दिवसात फोटो कॉपी मिळावी
- मुंबई विद्यापीठाने सर्व कॉलेजेस ३१ जुलैपर्यंत बंद ठेवा
- विद्यापीठाने ७५ टक्के हजेरी या नियमातून विद्यार्थांना यावर्षीसाठी संपूर्णपणे सूट द्यावी
- ATKT च्या परीक्षेसंबधी वाढवली जाणारी परीक्षा “फी” जवळपास दुप्पट आहे ती पूर्ववत करा
- डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरू आणि विद्यापीठाच्या प्रशासनातून हद्दपार करा
- निकाल विलंबाची चौकशी करा
- निकाल गोंधळाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई करून द्या
हेही वाचा -
मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मदतीला मुक्त विद्यापीठ
मुंबई विद्यापीठाच्या निकालाचे तीनतेरा