'करियर फेस्टिवल' @ वझे महाविद्यालय

  • भूषण शिंदे & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

मुलुंड - व्ही. जी. वझे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 'करियर फेस्टिव्हल'चं आयोजन करण्यात आलं होतं. 'निर्मल्स ब्राइट वे' संस्थेनं या फेस्टिव्हलचं आयोजन केलं होतं. गुरुवारी संपूर्ण दिवस चाललेल्या या फेस्टिव्हलमध्ये 20 महाविद्यालयातल्या विदयार्थ्यांनी सहभाग घेतला.

एमबीए, एमकॉम, एमए, एमएससी, एमपीएससी-यूपीएससी अशा अनेक पर्यायांनी भंडावून गेलेल्या विद्यार्थ्यांना या वेळी मार्गदर्शन करण्यात आलं. करियर करणाऱ्यांसाठी अनेक पर्याय आहेत. रियल इस्टेट, आयटी, मीडिया, बँकिंग, शेअर मार्केट, टुरिझम या सर्व पर्यायांमध्ये अनेक संधी भविष्यात उपलब्ध होणार आहेत. त्यांचाही विचार करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला. या वेळी व्ही. जी. वझे महाविद्यालयातले सर्व शिक्षक उपस्थित होते. जिज्ञासा जाधव, देवांगी, तेजस जाधव, सौरभ बांगर यांनी या कार्यक्रमाचं उत्तम नियोजन केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या