१० जानेवारीपासून राज्यात ओपन एसएससी बोर्ड; दिव्यांग, कलाकार, खेळाडूंना फायदा

कला, क्रीडा तसंच इतर क्षेत्रात रस असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकी अभ्यासक्रमाच्या पद्धतीमुळं आवडीच्या क्षेत्राकडं दुर्लक्ष होतं. यासाठी राज्य सरकारकडून दिव्यांग, कलाकार आणि खेळाडूंसाठी ओपन (सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट) एसएससी बोर्ड सुरू करण्यात येणार आहे. राज्यात येत्या १० जानेवारीपासून ओपन एसएससी बोर्डची स्थापना करण्यात येणार आहे.  यामुळं विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची गरज भासणार नाही. 

डिसेंबर, जूनमध्ये परिक्षा

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. या बोर्डाचा फायदा कला, क्रिडा क्षेत्रात काम करणाऱ्या आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना होणार अाहे. या विद्यार्थ्यांना आवडत्या क्षेत्रात वेळ देता येणार आहे. या बोर्डानुसार विद्यार्थ्याला वयाच्या दहाव्या वर्षी इयत्ता पाचवीची, वयाच्या तेराव्या वर्षी आठवीची, तर वयाच्या पंधराव्या वर्षी दहावीची परीक्षा देता येणार आहे. विशेष म्हणजे डिसेंबर आणि जून महिन्यात हे विद्यार्थी परीक्षेला बसू शकणार अाहेत. त्यांची ओपन एसएससी बोर्डातंर्गत परीक्षा घेण्यात येणार आहे. 


हेही वाचा - 

आयआयटीमध्ये वाया जाणाऱ्या अन्नापासून बायोगॅस निर्मिती, माजी विद्यार्थ्यांचं रिटर्न गिफ्ट


पुढील बातमी
इतर बातम्या