विद्यार्थ्यांची तुलना करणं चुकीचं - एनसीईआरटी

परीक्षेत मिळालेल्या गुण किंवा ग्रेडवर विद्यार्थ्यांची क्षमता ठरत नाही, त्यामुळे आपल्या मुलाची तुलना पालकांनी इतर विद्यार्थ्यांसोबत करणं चुकीच आहे, असं मत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) ने केली आहे.

'असं' करू नका

आजच्या स्पर्धेच्या युगात परीक्षेला फार महत्त्व प्राप्त झालं आहे. एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत कमी गुण मिळाले की पालक किंवा शिक्षक लगचेच त्याला तु मठ्ठ आहेस, तुला काहीच येत नाही, असं बोलतात. सतत हे बोलणं ऐकल्यानं विद्यार्थ्याच्या मनात शिक्षणाविषयी, परीक्षेविषयी भीती निर्माण होते. 

यामुळं विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाविषयी नकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. हा नकारात्मक दृष्टिकोन कमी करण्यासाठी आपल्या मुलांच्या शैक्षणिक कामगिरीची तुलना इतर मुलांच्या प्रगतीशी करणे चुकीचं असल्याचं एनसीईआरटीतर्फे सांगण्यात आलं आहे.

मार्गदर्शक तत्व जारी

नुकतंच एनसीईआरटीतर्फे निरंतर व सर्वंकष मूल्यांकनासाठी काही मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांच्या कामगिरीची अन्य विद्यार्थ्यांच्या कामगिरीसोबत तुलना करण्याऐवजी, त्यांच्याच आधीच्या कामगिरीशी तुलना करा, यामुळे त्यांचं शिक्षण आणि प्रगती साधता येईल. त्याशिवाय शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा कोणत्याही प्रकारे अपमान न करता आवश्यक ती मदत करावी. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळेल आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासही मदत होईल. असंही एनसीईआरटीतर्फे दिलेल्या मार्गदर्शक तत्वात म्हटलं आहे.


हेही वाचा - 

लॉच्या परीक्षा कॉलेजकडे सोपवण्यास विरोध

भावी पिढीला करियर कराचंय शेतीतच

पुढील बातमी
इतर बातम्या