गरीब विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षणाचा हक्क

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

मुंबई - गोर-गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी शिक्षण हक्क कायद्यांर्तगत खासगी शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. पण या कायद्याचे उल्लंघन शाळांकडून होत असल्याने हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. याची गंभीर दखल पालिका शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी घेतली असून प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता अशा शाळांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. यापुढे गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून दूर राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या