शाळा पुन्हा उघडल्या, मात्र स्कूल बसेसची कमतरता

(Representational Image)
(Representational Image)

मुंबईतील शाळा बुधवार, १५ डिसेंबरपासून इयत्ता १-७ साठी सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमिवर मंगळवारी, १४ डिसेंबर रोजी स्कूल बस मालकांनी सांगितलं की, विद्यार्थ्यांसाठी बसेसची कमतरता कायम राहील.

स्कूल बस ओनर्स असोसिएशन (SBOA) चे अनिल गर्ग यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, ड्रायव्हर तसेच इतर क्रूची भरती करण्यासाठी किमान एक महिना लागेल. गर्ग यांच्या म्हणण्यानुसार, सर्व स्कूल बस पुन्हा रस्त्यावर आल्या आहेत का हे पाहण्यासाठी एक महिना जाईल.

मुंबईत ८००० स्कूल बस आहेत. SBOA नं बस ऑपरेटर्सना दिलासा मिळावा यासाठी काही मागण्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री, अनिल परब यांच्यासमोर मंगळवारी मांडल्या आहेत.

गर्ग यांनी स्पष्ट केलं की, कोरोनाव्हायरसमुळे लागू लॉकडाऊनमध्ये गमावलेल्या वेळेची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच दीड वर्षांहून अधिक काळ स्कूल बसेस पडून असल्याची टीकाही त्यांनी केली.

शिवाय, गर्गचे असंही मत आहे की शाळांनी बस शुल्कात ३० टक्के वाढ ही केवळ इंधनाच्या दरवाढीमुळेच नव्हे तर कोविड-१९ महामारीमुळे देखील विचारात घेऊन केली पाहिजे. शाळा बसेस कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणं आवश्यक आहे असं मत त्यांनी मांडलं.

शिवाय, SBOA ने स्कूल बसचा "कालावधी" दोन वर्षांनी वाढवण्यासोबत रोड टॅक्स माफीची मागणी देखील केली आहे.


हेही वाचा

विध्यार्थ्यांना दिलासा! एकाच पुस्तकात ४ विषय

कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे १०वी-१२वीचे परीक्षा क्षुल्क माफ

पुढील बातमी
इतर बातम्या