दर आठवड्याच्या शेवटी म्हणजेच रविवारी मिळणारी शाळेची सुट्टी यावेळी मात्र मिळणार नाही. त्यामुळे पालकांनो, या रविवारी तुमच्या मुलांना शाळेत जावे लागणार आहे. कारण बुधवार 9 ऑगस्टला मुंबईत झालेल्या मराठा मोर्चामुळे दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली होती. तो दिवस भरून काढण्यासाठी येत्या रविवारी 13 ऑगस्टला दक्षिण मुंबईतील शाळा सुरू राहणार आहेत. तसे निर्देश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत.
9 ऑगस्टला मुंबईत लाखोंच्या संख्येने मोर्चेकरी दाखल झाले होते. यावेळी वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला होता. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना या बदलेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे त्रास होऊ नये यासाठी एक दिवस शाळा बंद ठेवण्यात येतील, असे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते.
पण शिक्षण विभागाने आता तो 9 ऑगस्टचा एक दिवस भरून काढायचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या रविवारी म्हणजेच 13 ऑगस्टला दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या शाळा सुरू राहणार आहेत.
हेही वाचा -