शिक्षकांचे आमरण उपोषण

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

आझाद मैदान –येथे गेले पाच दिवस महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविदयालय विभागाच्या शाळा कृती समितीचे सर्व शिक्षक कर्मचारी कुटुंबासमवेत आमरण उपोषणाला बसले आहेत. उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविदयालय विभाग, तुकडया, वर्ग यांची अनुदानपात्र यादी त्यांसंबधी अनुदानाची 100 टक्के आर्थिक तरतूद जाहिर करावी, तसेच तात्काळ शिक्षकांचा 100 टक्के पगार सुरु करावा. शाळांच्या मुल्यांकनाचे ऑफ लाईन मुल्यांकन आदेश देण्यात यावेत. या मागण्यांसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केलय. या शाळा कृती समितीचे सचिव प्रा. सी.एम. बामणे व राज्य अध्यक्ष प्रा.टी.एम.नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात येतय.

पुढील बातमी
इतर बातम्या