उन्हाळी सत्राच्या महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठानं हिवाळी सत्र परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. येत्या ४ ऑक्टोबरपासून मुंबई विद्यापीठाच्या प्रथम द्वितीय वर्षासह पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाने परिक्षांच्या तारखेची घोषणा केल्यामुळं अनेक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
विद्यापीठाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, यंदाच्या हिवाळी सत्रात एकूण ६६१ परीक्षा विद्यापीठामार्फत घेण्यात येणार असून या सर्व परीक्षा ४ ऑक्टोबर २०१८ पासून सुरु होत आहेत. तसचं या परीक्षा २२ जानेवारी २०१९ रोजी संपणार असून या परीक्षांच्या तारखांना नुकत्याच झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या सर्व परीक्षांच्या तारखा विद्यापीठाच्या वेबसाईटवर देण्यात आल्या असून लवकरच वेळापत्रही वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून प्रथमच सत्र ५ साठी पसंतीनुसार श्रेणी पद्धत ( Choice base credit system) राबवण्यात येणार आहे.
विद्यापीठानं पदवी परीक्षांसह कॉलेजस्तरावर होणाऱ्या परीक्षांच्या तारखाही जाहीर केल्या असून यंदा द्वितीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी सत्र ३ ची परीक्षा २४ ऑक्टोबरला, प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी सत्र १ ही परीक्षा २८ नोव्हेंबरपासून, द्वितीय वर्ष बीएमएस, बी.एस्सी. आयटी, बीएमएम सत्र ३ या परीक्षा २५ ऑक्टोबरपासून तर प्रथम वर्ष बीएमएस, बी.एस्सी. आयटी, बीएमएम सत्र - १ या सर्व परीक्षा २९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.
परीक्षा परिक्षेची तारीख
मुंबई विद्यापीठानं आतापर्यंत २७० परीक्षांचे निकाल लावलेले असून हे सर्व निकाल पदवी स्तरावरील परीक्षांचे आहेत. उन्हाळी सत्राच्या परीक्षांचं मुल्यांकन वेळेत झाल्यानं, निकाल वेळेत जाहीर झाले अाहेत. बाकी असलेले निकालही वेळेत होणार आहेत. त्याशिवाय हिवाळी सत्राच्या सर्व परीक्षा वेळेतच सुरू होत असून त्यांचे निकालही वेळेत लावण्यास विद्यापीठ प्रशासन प्राधान्य देणार आहे.
- डॉ. अर्जुन घाटुळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
हेही वाचा -
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पुन्हा गोंधळ