मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालामुळे विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अडचण येत होती. मात्र मुंबई विद्यपीठाने 15 सप्टेंबरपर्यंत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मुदतवाढ दिली आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने 30 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ केली आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स शाखेच्या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदविका प्रवेश देण्यात येतील. यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरायचे आहेत.
मुक्त विद्यापीठाचे अनेक शैक्षणिक अभ्यासक्रम मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमात उपलब्ध आहेत. समाजशास्त्र प्रमाणपत्र आणि पूर्वतयारी यासाठी बारावी अनुत्तीर्ण किंवा वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्वांना प्रवेश घेता येऊ शकतो.
या वर्षीपासून एमसीए अभ्यासक्रमही सुरू केला जणार असल्याची माहिती विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक प्रकाश आतेकर यांनी दिली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यपीठात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी http://ycmou.digitaluniversity.ac किंवा www.ycmou.ac.in या संकेतस्थळाला भेट देता येईल.
हेही वाचा -