अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याबद्दल सध्या सोशल मीडियावर भलतीच चर्चा आहे. हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असून लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचंही सांगितलं जात आहे. अर्थात, या दोघांकडून जरी याबद्दल जाहीर वाच्यता केली जात नसली, तरी आता त्यांच्या नात्यावर ऋषी कपूर यांच्या एका ट्विटमुळे शिक्कामोर्तब झाल्यातच जमा आहे.
ऋषी कपूर यांनी ट्विट करताना म्हटलंय, 'मी भट्ट परिवारासारख्या टॅलेंटेड परिवारासोबत काम केलं आहे. महेश भट्ट, मुकेश भट्ट, रॉबिन भट्ट, पूर्णिमा जी, सोनी भट्ट, पूजा भट्ट, इमरान हाशमी, आलिया भट्ट अशा सगळ्यांचा मी आभारी आहे.' एकीकडे रणबीर-आलियाच्या नात्यावर जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्याचवेळी ऋषी कपूर यांच्या या ट्विटमुळे या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे.
याआधी अनेकदा अभिनेते ऋषी कपूर त्यांच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेमध्ये राहिले आहेत. यंदाच्या ट्विटमध्ये तर त्यांनी थेट रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नात्यालाच अप्रत्यक्षपणे समोर आणणारं ट्विट केलं आहे. या ट्विटवरून तरी असंच वाटतंय की आलियाचं ऋषी कपूर यांना भारीच कौतुक आहे!
आलिया आणि रणबीर करण जोहरच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा सुरू होती. सोनम कपूरच्या लग्नातही हे दोघं जेव्हा एकत्र दिसले, तेव्हा तर या चर्चांना अधिकच उधाण आलं. रणबीरनेही एका मुलाखतीदरम्यान आलियाच्या 'राजी' सिनेमातल्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. शिवाय 'आलिया माझी क्रश आहे', असंही रणबीर म्हणाला होता.
हेही वाचा