95th Academy Awards: राजमौलींच्या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर

ऑस्कर पुरस्कार 2023 म्हणजेच 95 व्या अकादमी पुरस्कार 2023 ची लवकरच घोषणा करण्यात आली आहे. 'सर्वोत्कृष्ट मूळ गाणे' श्रेणीत नामांकन मिळालेल्या एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्यावर प्रत्येक देशवासीयांचे लक्ष लागले होते. अखेर नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाला आहे. 

लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर सोहळा पार पडत आहे. यावेळी 'नाटू नाटू'वर लाईव्ह परफॉर्मन्सही झाला आहे. गाण्याचे संगीतकार एमएम कीरावानी यांचा मुलगा काळ भैरव आणि गायक राहुल सिपलीगुंज यांना 'नाटू नाटू'वर लाईव्ह परफॉर्म करण्याची संधी मिळाली.

एसएस राजामौली, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर ऑस्कर अवॉर्डसाठी आधीच पोहोचले होते. एवढेच नाही तर यावेळी दीपिका प्रेझेंटर म्हणून ऑस्करमध्ये सहभागी झाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या