भूषण आणि पल्लवी पाटीलची नवी जोडी!

गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी सिनेसृष्टीत अनेक नवीन जोड्या पहायला मिळू लागल्या आहेत. अशीच एक नवी जोडी 'तू तिथे असावे' या लवकरच रिलीज होणाऱ्या सिनेमात पाहायला मिळणार आहे. अभिनेता भूषण प्रधान व अभिनेत्री पल्लवी पाटील ही नवी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त उत्साहात पार पडला आणि लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात होईल.

आयुष्यात कधी कोणत्या अडथळ्यांना आपल्याला सामोरे जावे लागेल, हे सांगता येत नाही. अशावेळी हताश न होता आयुष्य कसं जगावं? या सर्व गोष्टींवर भाष्य करणारा एका वेगळ्या विषयावरचा चित्रपट म्हणजे 'तू तिथे असावे'. भूषण प्रधान, पल्लवी पाटील यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, सुनील तावडे, मास्टर तेजस पाटील हे कलाकार या चित्रपटात आहेत.


हेही वाचा

प्रभास आणि अनुष्कामध्ये चाललंय काय?

पुढील बातमी
इतर बातम्या