भारतात यशाचे झेंडे गाडल्यानंतर आमिर खानचा 'दंगल' चित्रपट चीनमध्येही प्रदर्शित होणार आहे. पुढच्या महिन्यात 'दंगल' चीनमध्ये झळकणार आहे. चीनमध्ये प्रदर्शित होणारा हा आमिरचा पहिला चित्रपट नाहिये. तर यापूर्वीही त्याचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
तर 'थ्री इडियट्स' हा चित्रपटही धूमधडाक्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानेही चांगली कमाई केली होती.
आमिर खानचा 'दंगल' चीनमध्ये ५ मेला प्रदर्शित होणार आहे. आमिरचे चाहते फक्त भारतातच नाही तर चीनमध्येही मोठ्या प्रमाणात आहेत. आमिरच्या बाकी चित्रपटांप्रमाणेच 'दंगल' चीनमध्ये कधी प्रदर्शित होईल याची वाट त्याचे चाहते पाहत होते. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे.
'दंगल' चित्रपटाने भारतात ३८५ करोडची कमाई केली होती. दंगल चित्रपट महावीर फोगट आणि त्यांच्या मुलींवर आधारीत आहे. या चित्रपटात आमीरने महावीर फोगट यांची भूमिका साकारली होती. चित्रपटाची वास्तविक कथा अनेकांना भावली होती.