रिंकू राजगुरुचा '२००' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, दमदार टीझर प्रदर्शित

अभिनेत्री रिंकू राजगुरुचा आगामी ‘200’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकू आता केवळ मराठी पुरतीच मर्यादीत न राहता हिंदीतीलही एक ओळखीचा चेहरा बनत आहे. ‘सैराट’ चित्रपटापासून आपला प्रवास सुरू करणारी रिंकू त्यांनतर काही चित्रपटांत झळकली.

मागील वर्षी ती ‘100’ या बेवसीरिजमध्ये दिसली होती. तर आता ‘200’ तिचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याची घोषणा नुकतीच करण्यात आली त्यानंतर चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये 200 महिला खटला सुरू असताना अचानक न्यायालयाच्या दिशेनं धावत येतात. तर आता ही गप्प बसण्याची वेळ नाही, पोलिसांना आपलं म्हणणं ऐकावंच लागेल. अशा पद्धतीचे डायलॉग कानावर पडत असल्यामुळे त्यामुळे एका महिलेचा नाही तर अनेक महिलांचा लढा या चित्रपटातून दिसणार आहे.

‘200’ मध्ये साहील खट्टर, इंद्रनिल सेनगुप्ता, उपेंद्र लिमये, सलोनी बात्रा हे देखील दिसणार आहेत. झी5 वर या चित्रपटाचा प्रिमियर होणार आहे. याविषयी झी5 च्या हेड निमिशा पांडे म्हणाल्या की, 200 सारखी कथा असणाऱ्या चित्रपटाला झी5 सारखा प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं होतं. त्यामुळे हा चित्रपट जगापर्यंत पोहोचू शकतो

चित्रपटात अभिनेत्री रिंकूसह, अभिनेते अमोल पालेकर आणि बरुण सोबती हे ही दिसणार आहेत. या चित्रपटाला दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित करणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती युडली फिल्म्स करणार आहे. निर्मात्यांच्या मते चित्रपटाची कथा एका दलित महिलेची असून तिच्यासोबत झालेल्या अन्यायाविरोधातील लढ्याची असणार आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या