वैभव-अंकिताची मैत्री कशी झाली? वाचा

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

तरुणींचा लाडका अभिनेता वैभव तत्ववादी आणि हिंदी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आहे. इतकंच नाही तर हे दोघे प्रथमच एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेल्या माणिकर्णिका- द-क्वीन ऑफ झांसी या सिनेमात वैभव-अंकिता आपल्याला पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

कशी झाली या दोघांची मैत्री?

अंकिता आणि प्रार्थना बेहरे या दोघांमध्ये घनिष्ट मैत्री असल्याचं सर्वांनाच माहीत आहे. त्याचप्रमाणे प्रार्थना वैभवचीही खूप चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे प्रार्थनानेही आपल्या मैत्रिणीची वैभवशी चांगली ओळख करून दिली होती. एकंदरीत वैभवने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमधून त्या दोघांची मैत्री चांगलीच फुलली आहे.

सध्या वैभव 'मणिकर्णिका'’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्या आधी वैभवचा 'व्हॉट्सअॅप लग्न' हा मराठी सिनेमा १६ मार्चला प्रदर्शित होत आहे. या सिनेमात वैभवसोबत प्रार्थना बेहरे प्रमुख भूमिकेत आहे. याआधी 'कॉफी आणि बरचं काही’, 'मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी' तर आता 'व्हॉट्सअॅप लग्न' हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. वैभव आणि प्रार्थनाचा हा एकत्रित तिसरा चित्रपट आहे.  त्यामुळे या दोघांचा तिसरा चित्रपट बघायला त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या