'बचपन का प्यार' गाणारा सहदेव 'या' गायकासोबत झळकणार म्युझिक अल्बममध्ये

सध्या संपूर्ण सोशल मीडियावर ज्या एका गाण्यानं प्रचंड धुमाकूळ घातला आहे, ते गाणं गाणारा मुलगा देखील तितकाच लोकप्रिय होताना दिसतोय. ‘बचपन का प्यार मेरा’ (Bachpan Ka Pyar Mera) हे गाणं गाणारा लहानगा सहदेव फारच व्हायरल होत आहे.

अनेक सेलिब्रिटींनीही या गाण्यावर व्हिडिओज शेअर केले. त्यामुळे सहदेव कुमार दिर्दो (Sahadev Kumar Dirdo) हा लहान मुलगा लोकप्रिय होताना दिसत आहे. तब्बल २ वर्षांपूर्वी त्यानं गायलेल हे गाणं आता मात्र व्हायरल होत आहे.

छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनाही या गाण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही सहदेवची भेट घेऊन त्याच्याकडून हे गाणं गाउन घेतलं. तर आता त्याला एक म्यूझिक अल्बमही मिळाला आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर , गायक बादशाहनं (Badshah) आता सहादेवला त्याच्या आगामी अल्बम मध्ये घ्यायचं ठरवलं आहे. बादशाहनं त्याला चंदिगढला येण्याचं निमंत्रण दिलं. त्यानंतर नुकताच बादशाहनं सहदेव सोबत एक फोटो शेअर केला आहे. तो प्रचंड व्हायरल होत आहे.

बादशाहनं शेअर केलेल्या पोस्टवर प्रचंड लाईक्स मिळत आहेत. तर त्याच्या लाखो चाहत्यांनी त्याचं अभिनंदन ही केलं आहे. त्यामुळे बादशाहच्या कोणत्या नव्या अल्बममध्ये सहदेव दिसणार किंवा गाणार याची आता त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.


हेही वाचा

राज कुंद्रा प्रकरणावर अखेर शिल्पा शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाली...

रिंकू राजगुरुचा '२००' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, दमदार टीझर प्रदर्शित

पुढील बातमी
इतर बातम्या