‘बिग बॉस मराठी२’ चा विजेता शिव ठाकरेच्या गाडीचा भीषण अपघात!

‘बिग बॉस मराठी२’ चा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता शिव ठाकरेच्या गाडीचा अपघात झाला आहे. त्याचा अपघात २० नोव्हेंबर रोजी झाला. शिव त्याच्या कुटुंबासोबत अमरावतीहून निघाला होता. त्यावेळी वळगाव इथं त्याच्या गाडीला एका टेम्पो ट्रॅव्हलरनं मागून धडक दिली. या अपघातातून शिव आणि त्याचे कुटुंबीय थोडक्यात बचावले आहेत. मात्र शिवच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे.

शिव त्याच्या कुटुंबासोबत अमरावतीहून अचलपूरकडे निघाला होता. त्यावेळी वळगावच्या जवळ एका टेम्पो ट्रॅव्हलरनं त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. टेम्पो ट्रॅव्हलरनं धडन दिल्यानंतर शिवची गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका शेतात जाऊन कलंडली.

या अपघातात शिव, त्याची आई आणि बहिणीला दुखापत झाली आहे. या भीषण अपघातानंतर सोशल मीडियावर शिवचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. शिवच्या अपघाताची बातमी कळताच त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत त्याच्या आणि त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे.

शिवने ‘बिग बॉस मराठी २’ मध्ये प्रेक्षकांची मने जिंकली. त्यापूर्वी शिव एमटीव्ही ‘रोडीज’मध्ये दिसला होता.

इतर बातम्या